Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवलग्न सोहळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०६-: प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात दस-या शुभमुहूर्तावर शिवलग्न कार्यक्रम बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता रामेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता सातेरी मंदिरात विसावल्या. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या तरंगदेवतेचे दर्शन घेत श्रीफळ ठेवले.

Read More

आदर्श हिदी अध्यापिका पुरस्कार जाहीर

⚡वेंगुर्ला ता.०६-: हिदी प्रचार सभा वेंगुर्ला तर्फे देण्यात येणार आदर्श हिदी अध्यापक व अध्यापिका पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये श्रद्धा नाईक व मनाली कांबळी यांचा समावेश आहे.

Read More

मळगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मुर्तीचे पुजन संपन्न

भिल्लवाडी ग्रुपच्या विशेष प्रयत्नाने मळगाव गावच्या शिरपेचात आणखी भर* ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने मळगाव ग्रामपंचायतीच्या परवानगीने तसेच समस्त मळगाव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बुधवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात करण्यात आले. भिल्लवाडी ग्रुपच्या या प्रयत्नाने मळगाव गावच्या शिरपेचात आणखी भर पडली आहे. पूजनावेळी प्रमुख पाहुणे…

Read More

सिंधुदुर्गातील रस्ते, पर्यटन व अनेक समस्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार

राजन तेली यांची माहिती; भाजपच्या पहिल्याच पालकमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत होणार ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपचे पहिले पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम. रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पालकमंत्र्यांच्या या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात जिल्ह्यातील रस्ते, पर्यटन व अनेक समस्यांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची…

Read More

कळवली येथील गांगेश्वर मित्रमंडळतर्फे फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धा

⚡कणकवली ता.०६-: गांगेश्वर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त वाडीमर्यादीत फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त खास मुलांसाठी फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच संगीत खुर्ची खेळासाठी लहान मुलांसोबत मोठ्या युवक- युवतींनी सहभाग घेतला.गांगेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अत्यंत नीटनेटके आयोजन करून सूत्रबद्धरित्या नवरात्रोत्सव…

Read More

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाने १०० वादने पूर्ण करून रचला नवा किर्तीमान

⚡कणकवली ता.०६-: एनबीएस चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच १०० वादने वादनाचा विक्रम प्रस्थापित केला आहे, अनेक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये व राज्याबाहेर देखील १५० स्त्री पुरुष कलाकारांच्या संचात १०० वादने पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. संस्कृती संवर्धन आणि ढोलताशा परंपरा हे नाते आगळेवेगळे आहे आणि हे काम युवक युवतींनी सन्मापूर्वक…

Read More

नांदगावात वन्यजीव सप्ताह निमित्त सापांची ओळख व माहीतीपर मार्गदर्शन

⚡कणकवली ता.०६-: वन्यजीव सप्ताह १ आक्टोबर ते ७ आक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह निमित्त सापांची ओळख व माहीतीपर मार्गदर्शन करण्यात आले.सदर मार्गदर्शन वनविभाग सावंतवाडी,वनपरीक्षेत्र कणकवली, वनपरिमंडळ फोडा आणि सर्पमित्र इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.वन्यजीव संरक्षण आणि सापांची ओळख आणि सापांबद्दल गैरसमज याची…

Read More

निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि प्लास्टिक मुक्ती उपक्रम

न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम: ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ- : न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाने निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि प्लास्टिक मुक्ती हा एक स्तुत्य उपक्रम गावात राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गणेशोत्सव कालावधीत बऱ्याच प्रमाणात निर्माल्य…

Read More

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील पहिला वैकुंठरथ कणकवलीरांच्या सेवेत

5 लाख 75 हजाराच्या वैकुंठ रथाचे समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले लोकार्पण ⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वडील कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ तब्बल 5 लाख 75 हजार रुपये किमतीचा वैकुंठरथ कणकवली शहराकरिता लोकार्पण केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील हा अशा प्रकारचा पहिला वैकुंठरथ असून भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी…

Read More

मातोश्री कला व क्रीडा मंडळाला भविष्यात सर्वतोपरी मदत करणार

विशाल परब;नवरात्रोत्सवाच्या सांगता समारंभाता विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण ⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ले येथील मातोश्री कला व क्रीडा मंडळ वेंगुर्लाच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपची युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पार पडला.भविष्यात आपण या मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आपल्या भाषणात बोलताना विशाल परब यांनी दिले. विशाल परब यानी वेंगुर्ला…

Read More
You cannot copy content of this page