वाफोली सरपंच पदी उमेश शिरोडकर बिनविरोध

देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांनी केले अभिनंदन

बांदा/प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाफोली गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल उमेश शिराडकर यांचा वाफोली देवस्थान समितीचे अध्यक्ष विलास गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच श्री शिरोडकर यांनी आपण गावाच्या विकासासाठी सर्वाना सोबत घेऊन पक्षविरहीत काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी वाफोली सोसायटी अध्यक्ष धनश्री गवस, विनेश गवस, अमोल कळंगुटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page