⚡कणकवली ता.०८-: परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळातर्फे रविवार २५ डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन येथील कणकवली कॉलेजच्या सभागृहात केले आहे.
मार्गदर्शन वर्गात पुणे येथील अमोल नवलपुरे, किसन चौधरी, कल्याण कडेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) शिष्यवृत्ती, पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती व पालकांसाठी स्वतंत्र असे तीन वर्ग असून गणित व बुद्धीमत्ता या विषयांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाचे
अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव अशोक सापळे, व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी केले आहे. मार्गदर्शन वर्गाच्या अधिक माहितीसाठी शैक्षणिक
मंडळाचे सदस्य गजनान उपरकर ( ९६६१३४७५२५) या क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, संस्थानतर्फे घेतली जाणारी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारी २०२३ कणकवली व सावंतवाडी या दोन केंद्रावर घेतली जाणार
आहे. त्याकरिता २५डिसें.पासून प्रवेश स्वीकारले जाणार आहेत.
