केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित;माजी खा निलेश राणे यांनाही मिळतेय खंबीर साथ
⚡मालवण,ता.०९:-: राजकारणात अनेक उलथापालथी होत असतात परंतु, काही निवडकच असतात जे आपल्या नेत्याची साथ सोडत नाहीत. त्यातील एक म्हणजे भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्याचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने घेतलेला हा धावता आढावा…
सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून तळमळीने काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नारायण राणे यांना मालवण मधून आमदार करण्यासाठी ज्या लोकांनी दिवस रात्र मेहनत घेतली त्यात अशोक सावंत हे देखील होते. त्यामुळेच नारायण राणे आणि अशोक सावंत यांचे नाते अगदी दृढ झाले. त्यांनी १९९२ साली सक्रिय राजकारणात येत जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देखील गेले. त्यानंतर १९९७ मध्ये ते पंचायत समितीचे देखील सदस्य म्हणून निवडून आले. या कालावधीत सभापती कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची २००५ सालची जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची कारकीर्द सर्वत्र गाजली होती. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदचे सर्व सदस्य नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेस मध्ये सामील झाले. त्यामुळेच नारायण राणे यांच्या ह्रुदयात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
