⚡कणकवली ता.०८-: 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिधुदूर्ग )व लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या सयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
या ठिकाणी लाभ घेणार्याना मोतीबिंदू ऑपरेशन्स, लेन्स बसवणे, आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .यावेळी फेको तंत्रज्ञानाद्वारे बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती देण्यात आली. तिरळेपणा व बाल नेत्रोपचार.अचूक चष्मा नंबर देण्यात आले.शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था करण्यात आली.
नेत्र शिबिर यशस्वी करण्यात ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या मालवण तालुका महिला संघटक सौ. संजना गावडे, सदस्य सौ मीनल पार्टे, सौ. स्वरदा माळकर, मालवण तालुका खजिनदार श्री. रितेश सावंत यांनी मेहनत घेतली. व नेत्र शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या नेत्र शिबिराला 67 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराला ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
मालवण तालुका सचिव राजेश कुमार लब्दे, जिल्हा सदस्य अर्जुन परब तसेच सदस्य रोहित हडकर त्याचप्रमाणे कणकवली तालुका संघटक ऋषिकेश (दादा) कोरडे तसेच लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय कणकवलीचे डॉ. सिद्धार्थ तांबे उपस्थित होते.
ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नेत्र शिबिराचा 67 नेत्र रुग्णांना लाभ
