Headlines

Global Maharashtra Breaking News

वेतोरे हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

वेंगुर्ला ता.१०- सन २०२१-२२ मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेतोरे येथील सातेरी हायस्कूलमधील मयुरी महेश गावडे, जाई सुदेश धुरी व साक्षी संजय गावडे हे तीन विद्यार्थी ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीधारक ठरले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय परब, पी.बी.वगरे, एस.एम.नाईक, पी.पी.पालव यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले. सहाय्यक शिक्षिका डी.एम. प्रभू यांनी…

Read More

पाठांतरमध्ये ज्ञानेश्वर तर वक्तृत्वमध्ये अदिती, अलिशा, निर्जरा प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेताळ प्रतिष्ठान यांनी तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील जैतिराश्रीत संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात विविध गटांत जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यात ज्ञानेश्वर तांडेल, अदिती चव्हाण, अलिशा पाटकर व निर्जरा पाटील यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकाविला.गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यातील पहिली ते चौथी इयत्तेतील एकूण ३६ स्पर्धक सहभागी झाले…

Read More

‘ढ‘ मंडळी ठरली सरस; एकांकिका स्पर्धेत ‘वाल्मिकी‘ प्रथम

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ‘ मंडळींची ‘वाल्मिकी‘ प्रथम ⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ‘ मंडळी-पिगुळी यांच्या ‘वाल्मिकी‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख १० हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत व स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७…

Read More

आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे युवराज लखम सावंत भोसले यांनी केला शुभारंभ

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१०-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, आय…

Read More

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचे सजगत्व महत्त्वपूर्ण…

प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यानातून प्रबोधन ⚡सावंतवाडी ता.१०-: गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी हे मोबाईल ॲडिक्ट झालेले आहेत. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पालकांची सजगता आपल्या मुलांना योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त…

Read More

पालकांच्या योग्य संस्कारवरच मुलाचे भवितव्य अवलंबून

अभिलाष अवस्थी;निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न ⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ-: पाल्यावर पालकांनी केलेल्या योग्य संस्कारावरच आपल्या मुलाचे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षणातील विविध संधी त्यांना प्राप्त होऊ शकतात, असे प्रतिपादन हिंदी साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभिलाष अवस्थी यांनी निरवडे येथे केले. निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी अवस्थी बोलत…

Read More

कलंबिस्त इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक अभिजित जाधव मारहाण प्रकरणी सात जणांना अटक

न्यायालयीन कोठडीत रवानगी ⚡सावतंवाडी ता.०९-: कलबिस्त इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक अभिजित वसंत जाधव यांना मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सातही जणांना अटक करून सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.रविवारी मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधिताविरोधात मारहाण व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

विभागीय स्पर्धेत पुन्हा एकदा त्रिंबक हायस्कूलचे यश

⚡मालवण ता.०९-: सांगली येथे झालेल्या विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला सांगली कवठे महंकाळ येथे पडलेल्या १७ व १९ वर्षा खालील मुले – मुली विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील विजयी संघ सहभागी झाले होते यामध्ये १७ वर्षोखालील मुलांच्या गटात सिंधुदुर्गचे नेतृत्व जनता विद्यामंदिर त्रिंबक…

Read More

नादुरुस्त शौचालये, स्वच्छ्ता गृहे सुस्थितीत करा

ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचे प्रशासक यांना निवेदन ⚡मालवण ता.०९-: मालवण शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालये व स्वच्छता गृहे नादुरुस्त होऊन त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिक, महिला व पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही शौचालये व स्वच्छता गृहे सुस्थितीत करण्यात यावीत अशी मागणी शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा…

Read More

कणकवलीत दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ

भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन ⚡कणकवली ता.०९-: परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त परमहंस भालचंद्र महाराज संस्थान व वाळकेश्वर मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १३ जानेवारी या कालावधीत दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचेउद्घाटन संचयनी बिल्डिंग येथील पारकरघरासमोर भालचंद्र महाराज संस्थांचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते झाले.यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page