पारंपारिक जुन्या घरांच्या रचनेनुसार आधुनिक (आरसीसी) घरे बांधण्याची संधी…

आर्किटेक श्री शंकर सावंत यांचा नवी संकल्पना……
इच्छुकांनी संपर्क साधावा..

⚡सावंतवाडी ता.०२-: पारंपरिक जुन्या घरांची रचना तशीच ठेवून नव्या पध्दतीचे आधुनिक (आरसीसी) बांधकाम करुन टिकाऊ आणि पर्यावरण पूरक घरे उभारुन देतआहेत. इच्छुकांना हवी ती रचना करुन कमीत कमी व त्यांच्या बजेट नुसार घरे उभारून देत आहेत .
सावंतवाडीचा सुपुत्र असलेल्या शंकर सावंत यांनी मुंबई येथील जे जे कॉलेजमध्ये आर्किटेक्चर हे शिक्षण घेऊन गेली १० वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत . कोकणातील जुनी पारंपारिक घरांचा अभ्यास करता त्यावेळेच्या घरांच्या भींती या मातीच्या असायच्या लोंडबेरिंगसाठी लाकडाचा वापर केला जात असे मात्र कालांतराने मातीची घरांची जागा सिमेंट काॅक्रिटच्या घरांनी घेतली आणि एकप्रकारे कोकणातील पारंपारिकता हिरावली गेली. मात्र हीच पारंपारिकता पुन्हा जपण्याचा व आधुनिक पर्यावरण पूरक घर बांधण्याचा श्री सावंत याचा प्रयत्न आहे.

ते म्हणाले, कोकणातील पारंपरिक पद्धतीची जुनी घरे लक्षात घेता व्हरांडा, हॉल, पडवी किचन रूम, देवघर आधी रचना तशीच ठेवून नव्या पध्दतीने त्याला आरसीसी पद्धतीची जोड देऊन टिकाऊ घरे आम्ही उभारून देत आहोत. याशिवाय मातीची कौले वापरून आकर्षक डिझाईनही केली जाते. स्लॅब मध्ये मातीची मटकी वापरुन नैसर्गिक पद्धतीने थंडावा निर्माण केला जातो. समोरच्याला ज्या पद्धतीने घर पाहिजे त्या पद्धतीने त्याचे बांधकाम करून दिले जाते. ज्यांना अशा पद्धतीची घरे बांधण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या शिरोडानाका येथील कार्यालयात आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी अथवा 7768904571 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page