सैनिकी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी खास नियोजन;आदर्श गुरुकुल पद्धतीतील राज्यातील एकमेव सैनिक शाळा
आंबोली ता.०२-:सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव नामवंत असलेल्या या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सहावी ते सातवी आणि नववी ते अकरावी या इयत्तेसाठी प्रवेश देण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माजी सैनिक असोसिएशन संचलित असलेल्या या स्कूलमध्ये घरबसल्या प्रवेश घेण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इयत्ता 6 वीच्या वर्गासाठी एकूण 45 जागा व इयत्ता 7 वी ते 11 वी ( विज्ञान ) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण,
सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर व भव्य क्रिडांगण, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष व ग्रंथालय, उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक तसेच दर्जेदार शिक्षण, निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा, एन सी सी ज्युनिअर विभाग, करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा आदी वैशिष्ट्य संस्थेची आहेत. तसेच NDA, JEE, NEET, MHT-CET इत्यादी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते. प्रवेश नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी दीपक राऊळ- 9423304518,, राजेंद्र गावडे- 9403366229, संतोष गावडे- 9423250065 या भ्रमणध्वनिवर संपर्क साधण्याचे तसेच www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
