ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा सत्कार
⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पार्सेकर दशावतार नाट्य मंडळातून सलग २५ वर्षे विविध उत्कृष्ट भुमिका करणारे वायंगणी गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ दशावतारी कथा लेखक भाऊ भगत, रामेश्वर दशावतार मंडळाचे संचालक भैय्या गुरव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दशावतार आणि पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय…
