करवाढीला प्रशासकांकडून तात्पुरती स्थगिती ;

मुख्याधिकाऱ्यांना पत्र;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

⚡सावंतवाडी ता.०६-: नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. याला स्थगिती मिळावी यासाठी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या दरवाढीस स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या पत्राचा संदर्भ देत प्रशासक डॉ. जयकृष्ण फड यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगिती देण्याबाबतच पत्र दिल आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर व पाणीपट्टी यासंदर्भात जी करवाढ प्रस्तावित केलेली आहे त्या करवाढीस या आदेशान्वये तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.

You cannot copy content of this page