सावंतवाडी पोलीस स्टेशनजवळ रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवले…
सावंतवाडी, ता. ३ : शहरातील पोलीस स्टेशनजवळील मुख्य रस्त्यावर आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झाड तुटून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.याचवेळी त्या मार्गावरून जात असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून प्रसंगावधान दाखवत झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. फांद्या…
