Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानवसाधनचा मोलाचा वाटा…

पालकमंत्री चव्हाण:८७ मच्छिमारांना वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संस्थांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सिधुदुर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी आरवली येथे दिली.

Read Full News

देवगड निपाणी रोड ते असलदे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भुमिपुजन…

रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ; आ. नितेश राणेंचा सत्कार.. कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवगड निपाणी रोड ते गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भुमिपुजन व कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या रस्त्यासाठी रु. १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी…

Read Full News

जनसामान्यांपर्यंत स्वराज्य संकल्पना पोहोचावी हाच उद्देश राष्ट्रवादीचा उद्देश…

अबिद नाईक:विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला निबंध स्पर्धेला प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.१६-: छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य. अर्थात छत्रपतींचे राज्य हे प्रत्येकाला स्वतःचे राज्य वाटत होते स्वराज्य वाटत होते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार हे स्वतःचे सरकार अस प्रत्येकाला वाटत आहे याच भावनेतून स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले आहे.स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने या आयोजित करण्यात आलेली निबंध…

Read Full News

आयुष्यमान भारत योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर…

योजनेचे राज्यप्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १६आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम कौतुकास्पद असे आहे. सर्व यंत्रणेने अतिशय सक्षमपणे काम केल्याने हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतापर्यंत ६० टक्के आयुष्यमान कार्ड वितरित झाली आहेत. उर्वरित राहिलेली कार्ड आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेमध्ये कॅम्प घेऊन वितरित करण्याच्या तसेच ३ मार्च रोजी होणाऱ्या पोलिओ…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन कटिबद्ध…

मंदार हाडके: जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त व्यवसायिकांनी यामध्ये सहभाग.. ⚡मालवण ता.१६-: केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे मत पर्यटन मंत्रालय प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी तोंडवळी येथे बोलताना केले. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग…

Read Full News

मानसीश्वर जत्रौत्सव १७ रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्री मानसीश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.

Read Full News

रोणापाल येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…?

⚡बांदा ता.१६-: रोणापाल – आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या तरुणाने राहत्या घराच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Full News

सावंतवाडीत प्रथमच शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन…

अर्चना फाऊंडेशनच्यावतीने १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी १८ ते २० फेब्रुवारी कालावधीत आयोजित केले आहे.हे प्रदर्शन रोज…

Read Full News

पाडलोसमध्ये पाढे पाठांतर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡बांदा ता.१६-: पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 मध्ये तिन्ही शाळातील मुलांच्या पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते चौथी गटातील वर्गवार पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीर गावडे यांनी रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक वितरित केले. यावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Read Full News

सावंतवाडीत आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन…

अर्चना घारे यांचे सौजन्य: शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शरद पवार गटाच्या वतीने आज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत येथील मीना ग्रुप हायस्कूल जवळील अर्चना घारे परम यांच्या संपर्क कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने आयोजित केला…

Read Full News

You cannot copy content of this page