Global Maharashtra Breaking News

किंजवडे खालची बाईतवाडी कदमवाडी येथे मायनर ब्रीज बांधा…

सरपंच संतोष किंजवडेकर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी.. ⚡देवगड ता.१०-: देवगड तालुक्यातील किंजवडे येथील खालची बाईतवाडी कदमवाडी येथील अन्नपूर्णा नदीवरील साकव हा पूर्णतः जीर्ण झाला आहे. या ठिकाणी साकवा ऐवजी नव्याने मायनर ब्रिज व्हावा अशी मागणी किंजवडे सरपंच तथा भाजपा देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ नोंदीत घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट मिळणार…

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश ; प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती.. ⚡मालवण ता.१०-: महाराष्ट्रातील जे घरेलु कामगार १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत आहेत. अश्या घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. यास अनुसरून भारतीय मजदूर संघाने कामगार मंत्री सुरेश खाडे व सर्व जिल्हा पालकमंत्री…

Read More

माणगाव-कट्टावाडी ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण…

मंजूर रस्त्याबाबत अद्याप कार्यवाही नाही.. कुडाळ : तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव अंतर्गत येणार्‍या देणा बॅक ते जुनी शाळा नंबर 1 ( कट्टावाडी – वेताळाचे टेंब) या मंजुर रस्त्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणगाव कट्टावाडी…

Read More

हरकुळ (बु.) वादळग्रस्त अद्याप नुकसानभरपाई पासून वंचित…

सरपंच आनंद ठाकूर यांचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा.. ⚡कणकवली ता.१०-: हरकुळ बुद्रुक येथे में २०२४ मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ न मिळाल्यास २१ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकुर यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या…

Read More

रामगड येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रामगड कुंभारवाडी येथील गळाने मासे पकडण्यासाठी गुरुवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास गेलेला युवक राहूल कृष्णा जिकमडे हा बेपत्ता झाल्यावर कालपासून राहुल याचा ग्रामस्थ व प्रशासनाकडून शोध सुरु असताना आज तिसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर खडकाची कोंड येथे राहुल याचा मृतदेह सापडून आला. ग्रामस्थांच्या शोध…

Read More

ज्वेलरी पेठ मध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्ती घालावी…

ज्वेलरी पेठ मध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्ती घालावी… राजू मसुरकर: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: उभा बाजार सावंतवाडी ज्वेलरी पेठ येथे रात्री दोनच्या सुमारास अनोळखी व्यक्ती फिरत असल्याच निदर्शनात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी पोलिसांनी सतर्क राहून गस्ती घालावी अशी मागणी जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.

Read More

मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कूलचे यश…

मालवण दि प्रतिनिधीप्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शिक्षण विभाग (माध्यमिक) सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला तर अखिल भारतीय मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेत याच हायस्कूलची कुमारी दिया गोलतकर हिने तॄतीय क्रमांक मिळवला तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा…

Read More

कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची निवड…

कणकवली : तालुका भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडल अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी माजी सभापती दिलीप तळेकर यांची निवड आज ओरोस येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यानी जाहीर केली. निवडीनंतर नुतन तालुकाध्यक्षांचे पुच्छगुच्छ देवून आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले. माजी सभापती दिलीप तळेकर यांनी पंचायत समितीत प्रशासन…

Read More

संजू परब यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार…

मैदानात फुटबॉल खेळण्यासाठी दिली परवानगी; काही नागरिकांकडून करण्यात आला होता विरोध.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील स्वरार हॉस्पिटल समोरील जिमखाना मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्यापासून काही नागरिकांनी रोखले होते. याबाबत त्यांनी तात्काळ संजू परब यांची भेट घेऊन लक्ष वेधले. दरम्यान संजू परब यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्या कानावर गोष्ट घालून त्यांनी तात्काळ मुलांना ते ग्राउंड उपलब्ध करून दिले….

Read More

आंबोलीत वनखात्याच्या जमिनीत बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या…

आंबोली,ता.१०:येथील वन खात्याच्या राखीव जंगल आणि खाजगी वने च्या जागेत बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विक्री करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी पालकमंत्र्याकडे जनता दरबारात समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा,विज उपकेंद्र सुरु करा,बंगलेवाडी येथील साकवाच्या जागी पुलासाठी निधी मंजूर करा अशी मागणी केली आहे. आंबोली वन विभागाच्या राखीव आणि खाजगी…

Read More
You cannot copy content of this page