चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता..
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण पडोशी शाळेच्या जिल्हास्तरीय बाल दशावतार नाट्य स्पर्धेत शारदा विद्यालय डिगस शाळेचे यक्ष उध्दार हे नाटक प्रथम आले तर नवोदित बालदशावतार नाट्य मंडळ नेरूर माड्याचीडीचे गणेश ईच्छापूर्ती हे नाटक द्वितीय आले. चेंदवण पडोशी शाळेचा अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता चेंदवण गावातील हौशी कलाकारांनी सादर केलेले ” शौरी भीषण ” दशावतार नाट्यप्रयोगाने झाली.
यावेळी मुबई येथील उद्योजक कमलाकर शृंगारे ,समीर शृंगारे ,रोटरी सेवा प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक अजित कानशिडे, माजी विद्यार्थी दिलीप शृंगारे, प्रमोद शृंगारे,चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे देवेंद्र नाईक, ग्रा.पं सदस्य नारायण शृंगारे, सौ प्रणाली तेंडोलकर, सौ सुचिता पोयरेकर, माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक, पोलिस पाटील सौ शुभश्री शृंगारे व रामचंद्र पेडणेकर, विजय शृंगारे,परिक्षक पपू नांदोसकर व भास्कर सामंत, बॅ नाथ पै नर्सिंग काॅलेजच्या प्रणाली मयेकर, प्रशांत तेंडोलकर, भरत शृंगारे , मुख्याध्यापक सचिन मदने, उपशिक्षक भालचंद्र आजगावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे आदी उपस्थित होते.
बालदशावतार नाट्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे, प्रथम क्रमांक – शारदा विद्यालय डिगस (नाटक यक्ष उध्दार) , बक्षिस रोख रू 10 हजार ,प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह सौजन्य श्री प्रमोद शृंगारे ,द्वितीय क्रमांक नवोदित बालदशावतार नाट्यमंडळ नेरूर माड्याचीवाडी (गणेश ईच्छापूर्ती) बक्षिस रोख रू 5 हजार प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह सौजन्य नारायण शृंगारे. वैयक्तिक विजेते व बक्षिसे– उत्कृष्ट दिग्दर्शक – विलास सरनाईक – (दुर्गादेवी बालदशावतार जि.प.शाळा कुणकवळे मालवण), उत्कृष्ट राजा — रूद्र म्हापणकर (नवोदित बालदशावतार नेरूर माड्याचीवाडी), उत्कृष्ट राणी–अथर्व टुंबरे (नवोदित बालदशावतार नेरूर माड्याचीवाडी), उत्कृष्ट खलनायक – यक्ष भूमिका – सम्यक गायकवाड (शारदा विद्यालय डिगस) , उत्कृष्ट नारद कुणाल पवार (शारदा विद्यालय डिगस), उत्कृष्ट विनोदी कलाकार – माळी भूमिका -कल्पेश राकेश रेडकर (जय हनुमान बालदशावतार नाट्यमंडळ नांदोस मालवण), उत्कृष्ट प्रभावी भूमिका- राम – पार्थ गावडे
(भावईदेवी बालदशावतार नाट्यमंडळ रांगणातुळसुली नं 1), उत्कृष्ट संगीतसाथ हार्मोनिअम – मंदार जोशी (बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ), उत्कृष्ट संगीतसाथ पखवाज — यश खोत (शारदा विद्यालय डिगस), उत्कृष्ट संगीतसाथ तालरक्षक- संदिप कांबळे – (नटरंग बालदशावतार नाट्यमंडळ मणेरी दोडामार्ग) तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना रोख रू २ हजार मानधन व सहभाग प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह देण्यात आले.
चेंदवण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन मदने व सहकारी शिक्षक भालचंद्र आजगावकर यांनी कमी पटसंख्या असलेली जि.प.शाळा टिकावी या उद्देशाने जिल्हास्तरीय बालदशावतार नाट्य स्पर्धा भव्यदिव्यपणे आयोजित करून जिल्हयातील बालकलांकारांना व्यासपिठ दिल्याबद्दल कौतुक आहेच पण दशावतारी लोककलेचा जागर प्राथमिक शाळास्तरावर होणे आवश्यकच असल्याचे मत परिक्षक पपू नांदोसकर यांनी व्यक्त केले.
तब्बल पंधरा वर्षांनंतर चेंदवण गावातील हौशी दशावतारी कलाकारांनी एकत्र येत चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त साकार केलेले शौरी भीषण दशावतारी नाट्यप्रयोग उपस्थितांमध्ये बक्षवेधी ठरले.
शाळेच्या आपुलकीने पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी सौ माधुरी गवंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. चेंदवण गावातील हौशी दशावतार कलाकार निलेश गुरव (कृष्ण ),रमेश टुंबरे (मेघवर्ण),प्रथमेश मसूरकर (ऋषकेतू),अक्षय नाईक (अर्जून), राजेश मांजरेकर (नारद),यशवंत धामापूरकर (हनुमंत),दिलीप चेंदवणकर (भीषण), समीर घाडी (शौरी),संतोष सामंत (स्वप्नसुंदरी मोहिनी), बाबुराव मेस्त्री (हार्मोनिअम ), गंगाराम रेवंडकर (पखवाजवादक), विशाल राऊत (तालरक्षक) ,आदींचा सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ देवून शाळेच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
प्राथमिक शिक्षक सहदेव घाडी , प्रशांत वारंग ,यल्लापा दळवी, हृदयनाथ गावडे ,सदाशिव गावडे, काशिराम नाईक, प्रशांत केरकर आदींचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच चेंदवण पडोशी शाळेच्या सर्व पालकांचेही सन्मान करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र आजगावकर यांनी केले. संपूर्ण महोत्सवचे लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या कोकणसुपुत्र 07 युट्युब इन्फ्लूयेंसर प्रथमेश परब (पाट ) याचाही विशेष गौरव करण्यात आला.
