Global Maharashtra Breaking News

मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा उद्या जत्रोत्सव…

⚡मालवण ता.११-: मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव दि. १२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात देवीची पूजाअर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला भाजपच्या माध्यमातून शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.११-: भारतीय स्वातंत्र्याचा जागर करताना विद्यार्थ्यांच्या तनामनात देशभक्ती सदैव जागृत रहावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीमे अंतर्गत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अविरत प्रयत्न करून यश प्राप्त करा…

रमेश पिंगुळकर :मालवण तालुका देवळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न. मालवण दि प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात अविरत मेहनत व चिकाटीने प्रयत्न करावे प्रथम दर्शनी अपयश आले तरी चालेल मात्र खचून न जाता विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी मालवण येथे बोलताना केले. सिंधुदुर्ग…

Read More

बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी केली सुरु…

⚡बांदा ता.११-: बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खबरदारी घेण्यासाठी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली आहे. शहराचा विस्तार मोठा असल्याने सावंतवाडी नगरपालिकेची धुर फवारणी मशीन माजी नागराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. बांदा शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य…

Read More

महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये …

मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले खडे बोल:आमदार नितेश राणेंच्या मागणीची दखल घेत महायुती धर्म पाळण्याचा दिला संदेश.. ⚡कणकवली ता.११-: प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कोणी वाह्यात बोलू नये,वागू नये.महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म जो व्यक्ती पाळत नसेल अशा व्यक्तीला एक मिनिट सुद्धा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही….

Read More

दीपकभाईं ज्येष्ठ नेते;जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास:आजूबाजूच्या जिल्ह्यातील नेत्यांना लुडबुड करू देवू नका.. ⚡कणकवली ता.११-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका.महायुती म्हणून या…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची संजू शिरोडकर यांच्या ज्वेलरी शोरूमला भेट…

⚡सावंतवाडी ता.११-: केंद्रीय ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री नाम. श्रीपाद जी नाईक यांनी सावंतवाडी उभाबाजार येथील संजय शिरोडकर ज्वेलर्स या ज्वेलरी शोरूम ला सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री संजू शिरोडकर व सौ.सानिका शिरोडकर यांनी महालक्ष्मी प्रतिमा देऊन श्रीपादजी नाईक यांचे स्वागत केले.

Read More

बुद्धिबळातून एकाग्रता वाढते त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा…

दिलीप गिरप:आयडियल चेस ॲकॅडमी तर्फे वेंगुर्ले येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन.. ⚡वेंगुर्ले ता.११-: लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा हा धारगळकर सरांचा चांगला उपक्रम आहे. आपल्यातील खेळाला दिशा देण्यासाठी हेच वय महत्वाच असत. केवळ स्पर्धेसाठी खेळू नका. बुद्धिबळातून एकाग्रता वाढते तसेच संयमही राखता येतो. एक दोन विजय मिळविले म्हणून जल्लेश करून हूरळून जाऊ नका. खेळावर लक्ष केंद्रित…

Read More

कुडाळ येथे एटीएम मशीन फोडणाऱ्या दोन चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या…

कुडाळ :कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधील १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी २ चोरट्यांना रंगेहात पकडले. दरम्यान यामधील एका आरोपीने पळ काढला मात्र हा आरोपी पणदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपीने कार गाडीतून पळ काढला ते अद्याप सापडून…

Read More

संविधान बदलणार ही आवाज उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक…

संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू:आमदार नितेश राणेंचा संविधान जागर यात्रेतून इशारा.. कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. भारतात फक्त बाबसाहेबांचेच संविधान चालणार. संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही काढू. कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन होत डॉ. बाबासाहेब…

Read More
You cannot copy content of this page