अनंतराज पाटकर भरणार उद्या अर्ज:
छत्रपती संभाजी राजे यांनी दिला ए बी फॉर्म..
सिंधुदुर्गनगरी ता २८
माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने अनंतराज पाटकर यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे . २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनंतराज पाटकर यांनी आज दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार अनंतराज पाटकर यांनी माहिती दिली. प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे, यांच्यासह विविध पक्ष एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती (तिसरी आघाडी) निर्माण झाली आहे. या सर्व पक्षांच्या बळावर विधान सभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अनंतराज पाटकर यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. ते २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत . यावेळी ते कोणत्याही पद्धतीने शक्ती प्रदर्शन करणार नाहीत, शक्ती प्रदर्शनासाठी येणारा नाहक लाखो रुपये निधी खर्च न करता, हा निधी अंध, अपंग, अनाथ बांधवाना दान करणार आहेत. तसेच निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणे, आणि विकासाचे व्हिजन याबाबत माहिती जाहीर करणार असल्याची माहिती आज अनंतराज पाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली .
