Headlines

Global Maharashtra Breaking News

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर वर्धापन दिन सोहळा १२ मे रोजी…

⚡बांदा ता.०८-: वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक १२ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता प्रायश्चित्त विधी त्यानंतर यजमानांची शरीरशुद्धी, सर्व देवतांचे आवाहन, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, संभारदान, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, देवतास्थापना, श्री देवी माऊली व परिवार…

Read Full News

कोष्टी समाजबांधवांनी एकोपा कायम ठेवावा…

डाॅ. राजेंद्र उबाळे यांचे आवाहन ः कणकवली येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. कणकवली ः कोष्टी समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकसंघ राहिले पाहिजे. चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धादिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग कोष्टी समाजाचा एकोपा दिसून येतो, ही बाब कौतुकास्पद आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. समाजाच्या प्रगती व उन्नतीच्या कार्यात समाजातील युवा पिढीने पुढाकार घेतला पहिला. सिंधुदुर्ग…

Read Full News

वीज ग्राहक संघटना कणकवली पदाधिकाऱ्यांनी घेतली कार्यकारी अभियंता कणकवली यांची भेट…

पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी पावसाळ्यापूर्वीच आवश्यक ती कामे करून घेण्याची केली मागणी.. कणकवली : वीज ग्राहक संघटना कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांसह व्यापारी महासंघ कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या विजेच्या समस्या लक्षात घेता पावसाळ्या पूर्वीच योग्य ती खबरदारी घेऊन पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माळी यांच्याकडे केली. यावेळी वीज ग्राहक संघटना…

Read Full News

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना देणार घागर आणि नळांच्या माळेची भेट…

सावंतवाडी — सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे गावात जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत बंद पडली आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. लाखो रुपये खर्च करून राबवत असलेली योजना आता धुळकात पडली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी खेबडूलकर यांना लेखी निवेदन देऊन जलजीवन काम बंद असल्याने होणारी पाण्याची टंचाई बाबत कल्पना देऊनही अद्याप…

Read Full News

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक जाहीर…

सिंधुदुर्ग : पालकमंत्री ना. नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलद गतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी ७८२३८७१७९८ हा विशेष संपर्क क्रमांक सुरू करण्यात आला आहे. जनतेची सेवा हीच माझी जबाबदारी समजून, मी आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे आवाहनही पालकमंत्री ना. नितेश राणे…

Read Full News

विविध मागण्यांकरिता राज्यस्तरीय कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन..

कणकवली : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना मार्फत विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे. यावेळी दिनांक ७ मे २०२५ रोजी कणकवली तालुका कृषी सहायक संघटने मार्फत धरणे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले आहे. प्रमुख मागण्या कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी…

Read Full News

पालकमंत्री ना.नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

कणकवली : मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – गुरुवार ८ मे रोजी सकाळी ६: ४५ वाजता जुहू येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मुंबई येथे आगमन, ७ :२५ वा. मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०८:४० वा. मनोहर आंतराष्ट्रीय…

Read Full News

निरवडे येथील श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन उद्या

सावंतवाडी,ता.०७: निरवडे येथील श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन उद्या होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.निरवडे येथील श्री देवी सातेरीचा सालाबादप्रमाणे वर्धापन दिन उद्या गुरुवारी होत आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सकाळी अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती व तीर्थप्रसाद…

Read Full News

कुडाळमध्ये ११ रोजी ‘संविधान हवे, मनुस्मृती नको’ कार्यशाळा…

स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे झाल्याचे औचित्य:राज्यभरातील स्त्रीवादी महिला वक्त्यांचे मार्गदर्शन.. कुडाळ : स्त्रीमुक्ती चळवळीला पन्नास वर्ष झाली. त्या निमित्ताने येत्या ११ मे रोजी कुडाळमध्ये महालक्ष्मी हॉल येथे सकाळी १० ते ५ या वेळेत मनुस्मृती नको, संविधान हवे या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध स्त्रीवादी महिला वक्त्या मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कमलताई परुळेकर,…

Read Full News

कृषी सहाय्यकांचे कुडाळ यामध्ये धरणे आंदोलन…

मागण्या मान्य न झाल्यास १५ मे पासून बेमुदत कामबंदचा इशारा:तालुका सचिव धनंजय कदम यांची माहिती.. कुडाळ :महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारल आहे. या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत कुडाळ तालुक्यातल्या कृषी सहाय्यकांनी माठेवाडा इथल्या तालुका कृषी कार्यालयासमोर आज एक दिवशीय धरणे आंदोलन केलं. राज्यात ५ मे पासून टप्प्याटप्यान आंदोलन सुरु असून कृषी…

Read Full News

You cannot copy content of this page