Headlines

बांदा पंचायत समितीसाठी शहर विकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

⚡बांदा ता.२१-: बांदा पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्यासह राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, गिरीश भोगले, संदेश नाईक आदी उपस्थित होते.बांदा येथे सध्या भाजपची सत्ता असून पंचायत समितीची ही जागा महिला खुल्या प्रवर्गासाठी…

Read Full News

कणकवलीत जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल ; तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल…

⚡कणकवली ता.२१-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी पार पडली. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद च्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी…

Read Full News

सिंधुदुर्गात महायुतीचाच झेंडा फडकेल…

दत्ता सामंत:विरोधकांकडे उमेदवारांचा अभाव, सर्व जागा जिंकण्याचा विश्वास.. ⚡मालवण ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहे जर या निवडणुकीच्या महायुती मध्ये बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद महायुतीच्या नेत्यांकडे आहे त्यामुळे बंडखोरी होणार नाही याची आम्हाला खात्री…

Read Full News

अखेरच्या दिवशी कणकवलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी…

पंचायत समितीसाठी ६० ; तर जिल्हा परिषदेसाठी ३७ नामनिर्देशन.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याने तालुक्यातील निवडणूक वातावरण तापल्याचे चित्र होते. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांसाठी तब्बल ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, जिल्हा…

Read Full News

मराठी भाषा संवर्धनासाठी भोंसले कुटुंबीयांकडून देणगी…

⚡सावंतवाडी ता.२१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी मराठी भाषेचे स्व. प्रा.मिलिंद दत्ताजीराव भोंसले यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. २५ हजारची कायमस्वरुपी ठेव दिली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी बारावी परीक्षेत आरपीडी ज्युनि. कॉलेजमध्ये कला व्यापार व शास्त्र या शाखेतून मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या झोया शेख व झियाद शेखची राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु. झोया शेख हिने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित 50 मीटर व 100 मीटर रनिंग स्पर्धेत सब ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थी कु.झियाद शेख याने 60 मीटर रनिंग स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला. या…

Read Full News

कुडाळ मधून जि प साठी 48 तर पं स साठी 64 अर्ज दाखल…

पिंगुळी जि प साठी तब्बल 11 अर्ज दाखल.. कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जि प साठी 48 तर प स साठी 64 जणांनी अर्ज दाखल केले. पिंगुळी जि प साठी तर तब्बल 11 जणांनी अर्ज दाखल केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी दिली.जिल्हा परिषद…

Read Full News

सिंधुशौर्य बुदधिबळ स्पर्धेचा विजेता ठरला बाळकृष्ण पेडणेकर…

⚡सावंतवाडी ता.२१-: अखिल भारतीय विदयार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या सिंधुशौर्य जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा बाळकृष्ण पेडणेकर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. अभाविपने स्क्रीन टाईम ते ॲक्टिविटी टाईम या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविदयालयात जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील सव्वीस विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन महाविदयालयाच्या प्राचार्या डाॅ.स्मिता सुरवसे यांच्या…

Read Full News

बांदा येथील युग्धा बांदेकरचा राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात झेंडा…

⚡बांदा ता.२१-: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन मध्ये बांदा येथील विद्यार्थिनी युग्धा दीपक बांदेकर हिने सहभाग नोंदवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून केवळ दोन विद्यार्थिनींची निवड झाली असून, त्यामध्ये युग्धा बांदेकर हिचा समावेश आहे. विज्ञान व संशोधन क्षेत्रातील तिच्या नाविन्यपूर्ण विचारांची…

Read Full News

शिवजयंतीनिमित्त बांद्यात बालकलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचा महोत्सव…

⚡बांदा ता.२१-: शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती गंधर्व फोटो स्टुडिओ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या…

Read Full News

You cannot copy content of this page