Headlines

वायंगणी ज्ञानदीप हायस्कुल येथे ५ रोजी काकासाहेब आसोलकर स्मृतिदिन व पारितोषिक वितरण समारंभ…

⚡मालवण ता.०३-:वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.काकासाहेब आसोलकर यांचा २४ वा स्मृतिदिन अर्थात ज्ञानदीप संस्थेचा संकल्प दिन व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरूवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम ज्ञानदीप संस्था अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी श्याम चव्हाण…

Read Full News

जोपर्यंत रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही…

विशाल परब: महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार दीपक गवस यांना बहुमताने निवडून द्या.. ⚡दोडामार्ग ता.०३-: जोपर्यंत रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे ठाम मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. आज या भागात अनेक मूलभूत समस्या असून, विशेषतः रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात…

Read Full News

कळसुलीतील भोगनाथवाडी – बौद्धवाडी – कावळेटेंबवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा…

⚡कळसुली ता.०३-: कळसुली गावातील भोगनाथ मंदिर ते किशोर गावकर यांच्या घरापर्यंत सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. भोगनाथवाडी, बौद्धवाडी आणि कावळेटेंबवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या एक ते दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी…

Read Full News

महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव…

एकनाथ शिंदे :एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ मध्ये महायुतीची प्रचार सभा.. ⚡कुडाळ ता.०३-: निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेवजिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले….

Read Full News

श्री.मनीष दळवी यांच्या माध्यमातून मठ गावातील विकासकामांना गती…

⚡वेंगुर्ला ता.०३-: तालुक्यातील मठ हायस्कुल ते ठाकुरवाडी हा अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते व दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी याची त्वरित दखल घेत मठ कार्यक्षेत्रातील त्वरित एकूण आठ विकासकामांची भूमिपूजने केली होती. त्यानुसार यातील 5 कामे सुरुवात…

Read Full News

प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव: जिल्हा परिषदेचे विशेष अभियान…

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांना केले आवाहन.. ओरोस ता ३जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा मानस आहे. याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यांचाच एक भाग म्हणुन 9 फेब्रुवारी 2026 आंगणेवाडी यात्रोत्सव तर 15 ते 17 फेब्रुवारी 2026 या कुणकेश्वर यात्रोत्सव कालावधीत “प्लास्टिक मुक्त…

Read Full News

आश्वासन देणाऱ्यांना आता जागा दाखवा…

बाबुराव धुरी: तुम्ही मला एकदा हाक द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी.. ⚡दोडामार्ग ता.०३- :माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मतदारांनी कमळाला साथ दिली. मात्र त्या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली, याचा आता नागरिकांनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव धुरी यांनी केले. ते पुढे…

Read Full News

मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सव २०२६ चे श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०३-: बुधवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड, तसेच डॉ. कुणाल जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग…

Read Full News

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणाच्या आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो,…

Read Full News

महायुतीला १०० टक्के यश मिळणार…

दत्ता सामंत: झाराप, सुकळवाड येथे बंडखोरांवर कारवाई होणार.. ⚡मालवण ता.०३-:जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला १०० टक्के यश मिळणार असून खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात महायुतीला सर्वच ठिकाणी पोषक वातावरण दिसून येत असून महायुतीचा झेंडा जिल्हापरिषद व पंचायत समितीवर पुन्हा एकदा फडकेल असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे. जिल्हापरिषद, पंचायत…

Read Full News

You cannot copy content of this page