⚡सावंतवाडी ता.३१-: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून,गावातील नागरिक या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत भालावल येथे लोकसहभाग रक्कमेतून खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या वाचनालयास कोकण व शिक्षण विकास संस्था ,मुंबई यांच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य (इन्सुली मतदार संघ) सदाशिव राणे, भालावल सरपंच समीर परब,उपसरपंच,अर्जुन परब,कास सरपंच प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे,ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे ,ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर,सुमित्रा परब,रुक्षाली परब,महिला बचत गट सदस्या , सी आर पी लक्ष्मी परब,जनार्दन गावडे,पत्रकार मदन मुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकांचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना,गावातील ग्रामस्थांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी ,विचारवंतांचे विचार , सुसंस्कार या पुस्तकातून उपलब्ध व्हावेत या मुख्य उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था ,मुंबई यांच्या वतीने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी करून ,उपस्थित मान्यवरांचे पेरू झाड कलम देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने सदरील उपक्रमाची माहिती देण्यात आली. सरपंच समीर परब यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिल्याने संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी ,कर्मचारी केंद्र चालक प्रेमा परब, कृष्णा परब,लक्ष्मण कोकरे,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
