Headlines

चिवला बीचवर ‘ऑलिव्ह रिडले’ कासव मृतावस्थेत आढळले…

वनविभागाकडून पंचनामा करून विल्हेवाट… ⚡मालवण,ता.०५-:मालवण येथील चिवला बीचवर एक ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मृतावस्थेत आढळून आले असून स्थानिकांनी ही बाब तातडीने प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वनविभागाच्या मदतीने या कासवावर रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिवला बीच परिसरात फिरणाऱ्या स्थानिकांना समुद्रकिनारी एक कासव मृतावस्थेत पडलेले दिसले. स्थानिकांनी तातडीने याची माहिती प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांना…

Read Full News

मालवणमध्ये फेब्रुवारीत रंगणार ‘लेदर बॉल’चा थरार…

मालवण प्रीमियर लीग २०२६’ चे बिगुल वाजले… ⚡मालवण, ता.०५-:मालवणकरांच्या क्रीडाप्रेमाला नवी उभारी देण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेट कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब सज्ज झाला आहे. यंदा या स्पर्धेचे दिमाखदार ९ वे वर्ष असून अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी मालवण प्रीमियर लीग २०२६ ही लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत…

Read Full News

“फेक नेरीटिव्ह” शिवाय विरोधकांकडे कुठलेच विकासाचे मुद्दे नाहीत…

संदीप गावडे:तळवडे मतदारसंघात भव्य बाईक रॅली काढून केले जोरदार शक्तिप्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०५-विरोधकांकडे विकासाचे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने ते फक्त फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. मात्र जनता अशा अफवांना बळी न पडता विकासालाच साथ देईल आणि मला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देईल, असा विश्वास तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला. तळवडे जिल्हा परिषद…

Read Full News

महायुतीचा विजय इतिहास घडवेल…

काका कुडाळकर: विनायक राऊत वैभव नाईक यांनी या मतदार संघाला विकासा पासून वंचित ठेवले.. ⚡कुडाळ ता.०५-: महाविकास आघाडीकडे विकासाचे व्हिजन नाही, त्यांच्याकडे सक्षम नेता नाही असा टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी महाविकास आघाडीला लगावला. आमच्या महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी केलेली विकासकामे व मजबूत संघटन…

Read Full News

जि.प. आणि पं. स. निवडणुकांसाठी कुडाळ प्रशासन सज्ज…

एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात.. कुडाळ : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार असून, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी २२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या…

Read Full News

विकास हाच माझा एकमेव ध्यास…

संदीप गावडे: मतदारांनी मला मतांच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत.. ⚡सावंतवाडी ता.०५-:मला कोणावरही वैयक्तिक टीका करायला आवडत नाही. विकास आणि जनतेचे हित हाच माझा एकमेव ध्यास असून, त्याच उद्देशाने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. तळावडा मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे. त्यामुळे मतदारांनी मला मतांच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन संदीप गावडे यांनी केले. ते म्हणाले…

Read Full News

आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांची प्रचारात जोरदार मुसंडी…

शेवटच्या दिवशी प्रचारात आघाडी: एकतर्फी विजय होणार, कार्यकर्त्यांना विश्वास.. सावंतवाडी ता.०५-: आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांनी निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी थेट संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. आरोंदा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत…

Read Full News

उभादांडा गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.०५-: ” लक्ष्मीपूजनदिनी प्रतिष्ठापना तर होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विसर्जन ” अशा अनोख्या परंपरेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी संकष्टी चतुर्थीला संपन्न होत आहे. सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर दुपारी सत्यनारायण महापूजा, महाआरती संपन्न झाली असून भाविकांची दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी सकाळपासून मोठी…

Read Full News

माझ्या विरोधात माजगावमध्ये येऊन सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय…

दिनेश सावंत:लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली.. सावंतवाडी ता.०५-:मला कोणताही राजकीय वारसा नसताना आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना माझ्या विरोधात माजगावमध्ये येऊन सभा घ्यावी लागत आहे, यातच माझा विजय निश्चित असल्याचा दावा माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार दिनेश सावंत यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, यापुढे माझ्यावर कोणत्याही प्रकारची टीका करण्यात आली,…

Read Full News

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्र, गोवा व‌ कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेड्यांचा अधीपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यानिमित्ताने शेकडो भाविक देव उपरलकर चरणी नतमस्तक होत आहेत. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही…

Read Full News

You cannot copy content of this page