⚡सावंतवाडी ता.०२-: न्हावेली विवरवाडी श्री गणपती मंदिरात रविवार ५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून,सकाळी ८ वाजता रुद्राभिषेक,९ वाजता अभिषेक,१०:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता महाआरती,१:३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने तसेच रात्रौ ९:३० वाजता लोकराजा कै.श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत,श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (कुडाळ) यांचा ट्रिकसीनयुक्त ,”एकपदा” अर्थात पृथ्वीकंकण हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर सेवा समिती न्हावेली विवरवाडी यांनी केले आहे.
न्हावेली विवरवाडी गणपती मंदिरात ५ एप्रिल रोजी “पृथ्वीकंकण” नाट्यप्रयोग…
