Headlines

शहरासह तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरासह तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मारूतीचे रुप धारण केलेल्या मुलाने शहरातील विविध मंदिरांत जात भाविकांना आशिर्वाद दिले.

शहरातील सालईवाडा येथील श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लघुरुद्र व महापूजा, आरतीनंतर श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानंतर मारूतीचा वेश धारण केलेल्या मुलासह ढोल-ताशांच्या गजरात श्री हनुमान मिरवणूक शहरात काढण्यात आली. श्री सत्यनारायण महापूजेचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. नरेंद्र डोंगर, जुना बाजार, माठेवाडा, वैश्यवाडा, उभाबाजार, भटवाडी, खासकीलवाडा, सालईवाडा आदि विविध ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर येथील हनुमान मंदिरातही मोठा जल्लोष पहायला मिळाला. हनुमान जन्मोत्सवानंतर अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले होते. बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिरनजीक असलेल्या श्री देव पिंपळ मारुती मंदिरातही हनुमान जयंती उत्सव व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी हनुमंत जयंती साजरी करण्यात आली.

You cannot copy content of this page