सोमवतीनिमित्त उपवडेच्या ग्रामदेवतेचे सागरेश्वर किनारी तीर्थस्नान…
⚡वेंगुर्ला ता.१६-: सोमवती अमावास्येनिमित्त कुडाळ तालुक्यातील उपवडे गावची ग्रामदेवता आणि तरंगदेवतांनी आपल्या भक्तांसह आज सोमवारी सायंकाळी वेंगुर्ला येथील सागरेश्वर किनारी तीर्थस्नान केले. सोमवारी अमावास्या आल्याने तीर्थस्नान करण्यासाठी उपवडे गावची श्री पावणाई-रवळनाथ आदी ग्रामदैवत पालखीसह तसेच श्री रवळनाथ, श्री भूतनाथ आणि श्री पावणाई आदी तरंगदेवता यांचे वेंगुर्ला येथे आगमन झाले आहे. वेंगुर्ला शहरात प्रवेश केल्यानंतर या…
