Headlines

आडाळी एमआयडीसीतील अवैध उत्खनन व माती चोरीप्रकरणी दीपक केसरकर यांचा मोठा हात; त्यांची चौकशी लावा…

रुपेश राऊळ : चौकशी न झाल्यास जनआंदोलन उभारणार; निलेश राणे यांच्या आरोपांमुळे केसरकर मतदारसंघात अपयशी ठरल्याचे सिद्ध.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित खनिजयुक्त मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांचा सहभाग असू शकतो. मात्र, या प्रकरणामागे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर…

Read Full News

तिलारी घाटात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला…

खून की अपघात? पोलीस तपास सुरू… दोडामार्ग, : दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील तिलारी घाट परिसरात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, तिलारी घाटातून जाणाऱ्या काहीजणांना रस्त्यालगतच्या झुडपांमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी…

Read Full News

आडाळी एमआयडीसीतील कथित माती चोरी प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिले कारवाईचे आदेश…

⚡दोडामार्ग ता.३०-: आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या कथित खनिजयुक्त माती चोरी आणि बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेना शिष्टमंडळाने कठोर कारवाईची मागणी केली….

Read Full News

दारू, ड्रग्ज, गो-तस्करीपासून भ्रष्टाचारापर्यंत आरोपांची सरबत्ती…

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला..?”आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल.. ओरोस ता ३०सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जिल्ह्याचे मोठे…

Read Full News

मळगाव येथे ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन…

हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण या उद्देशाने रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजता मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे मळगाव पंचक्रोशी भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी तसेच भावी पिढीपर्यंत…

Read Full News

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी…

⚡कणकवली ता.३०-: कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या गतिरोधकांची पाहणी करण्यात आली. याशिवाय परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचाही आढावा घेण्यात आला. यावेळी तेजस राणे,…

Read Full News

आंबोलीत दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा उत्साहात संपन्न…

आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजन; दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन निवारणाचे आश्वासन.. ⚡आंबोली ता.३०-: सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आंबोली विभागातील दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात संपन्न झाला.या…

Read Full News

वेंगुर्ला आडेली येथील शेतकरी अजय गडेकर यांचा वीजपुरवठा खंडित…

पुन्हा एकदा स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात ; सोलार चा नवा फंडा जनतेच्या माथी…? ⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील रहिवासी शेतकरी अजय अशोक गडेकर यांच्या राहत्या घरातील विजपुरवठा विजवितरण मार्फत शुक्रवारी 29 मे रोजी खंडित करण्यात करण्यात आला आहे.कोणताही एसएमएस अथवा दूरध्वनी संबंधित शेतकऱ्यांना न देता हा प्रकार घडल्याने गोरगरीब शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे…

Read Full News

रोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार…

कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी झाली निवड.. ⚡कुडाळ ता.२९-: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी कुडाळ येथील रोहन सदानंद शारबिद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रित अधिकारी गट- अ) या पदावर रोहन शारबिद्रे याची निवड झाली. या पदासाठी परीक्षा झाली होती….

Read Full News

‘संडे ऑन सायकल’ मोहिमेत सहभागी व्हा…

रवींद्र खेबुडकर: ७जून रोजी जिल्हाभर सायकल रॅलीचे आयोजन… ⚡ओरोस ता २९-: तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने, तसेच ‘जागतिक सायकल दिना’चे औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार ७ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘संडे ऑन सायकल’ ही विशेष मोहीम ग्रामपंचायत व तालुकास्तरावर राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे….

Read Full News

You cannot copy content of this page