बांदा पीएचसीत ‘पल्स पोलिओ २०२६’ मोहिमेचा शुभारंभ
जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत उद्घाटन सावंतवाडी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलनकरून सकाळी 8 वाजता पोलिओ डोस पाजून या मोहिमेस प्रारंभ झाला. या उद्घाटन कार्यक्रमास बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या….
