मालवण प्रधान डाकघर येथे डाक मेळावा संपन्न…

⚡मालवण ता.२४-: पोस्टाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी मालवण येथील प्रधान डाकघर येथे डाक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या डाक मेळाव्यात नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली.

यावेळी मालवण डाक निरीक्षक अभिजीत जाधव, पोस्टमास्तर शिवराज खोत, महिला प्रधान एजंट कल्पना वेर्णेकर, संग्राम कासले, कुळसुंगे, कोळगे आदी उपस्थित होते.

याप्रंसगी मालवण प्रधान डाक कार्यालय येथे पोस्टाच्या योजनांची माहिती माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. तसेच लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना पोस्टामध्ये बचत खाते सुरू करण्यासाठी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page