पंचायत समिती इमारत ही मालमत्ता राणे कुटुंबीयाची नसून वैभववाडी तालुक्यातील जनतेची आहे…

अतुल रावराणे:नारळ फोडून नूतन पंचायत समिती इमारतीच शानदार उद्घाटन..

⚡वैभववाडी ता.२४-: वैभववाडी पंचायत समिती बांधकाम करून दहा वर्ष पूर्ण झाली तरी सत्ताधारी आमदार नितेश राणे आणि आपले खासदार वडिलांच्या नावाची पाटी लावण्यासाठी नूतन पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन करत नाही ही मालमत्ता राणे कुटुंबीयाची नसून आमचे वैभववाडी तालुक्यातील जनतेची आहे. असे आरोप करत बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांच्या हस्ते फित नारळ फोडून नूतन पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन करत पेढे वाढून आनंद साजरा करण्यात आला.

उद्या दुपारपर्यंत नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित व्हा असे आवाहन अधिकाऱ्यांना केले.
यावेळी युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाईक शिवसेना जिल्हा उपप्रमुख नंदू शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, तालुका युवा सेना प्रमुख रोहित पावसकर प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल धुरी जितेंद्र तळेकर नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत महिला तालुकाप्रमुख नलिनी पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page