दांडी किनारपट्टीवरील बंद पडलेले हायमास्ट टॉवर चालू करावेत…

सेजल परब: मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे मागणी..

⚡मालवण ता.२०-: मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवरील मिनी हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने रात्रीच्या वेळी याभागात काळोखाचे साम्राज्य पसरत असून हे टॉवर लवकरात लवकर पुन्हा चालू करण्यात यावेत, अशी मागणी मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण शहरातील प्रभाग ८ मधील दांडी येथील दांडेश्वर मंदिर, मोरेश्वर स्मशानभूमी आणि दांडी गावकर वाडा येथील मिनी हायमास्ट टॉवर बंद अवस्थेत आहेत. दांडी किनारपट्टी भागातील हे हायमास्ट टॉवर बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधकारमय स्थिती असून यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी हे हायमास्ट टॉवर लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा चालू करावेत, अशी मागणी सेजल परब यांनी या निवेदनातून केली आहे.

You cannot copy content of this page