मंत्री दिपक केसरकर: सावंतवाडीतील जनता माझ्यासोबत, त्यामुळे माझी उमेदवारी व विजय निश्चित..
⚡सावंतवाडी ता.२०-: मला माझ्या प्रॉपर्टी विकायची वेळ आली तरी चालेल पण मी माझा सिंधुदुर्ग मॉडेल पर्यटन बनवून दाखवणार असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केले.दरम्यान भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून एक विशिष्ट गतीने जिल्ह्याचा विकास करायचा आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री केसरकर पुढे म्हणाले माझी उमेदवारी आणि माझा विजय निश्चित आहे, त्यामुळे मला प्रचाराची गरज नाही मी ज्या गावात गेलो की ते गाव माझं होतं त्यामुळे जनता ही माझ्या पाठीशी आहे, विरोधकांनी माझी चिंता करू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान मल्टीस्पेशालिटीच्या तांत्रिक बाबी काही दिवसातच पूर्ण होणार असून त्याचा देखील काम लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती देखील श्री केसरकर यांनी यावेळी बोलताना दिली.
