मातृसंस्थेचे ऋण विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये…

साबाजी करलकर:गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..

⚡मालवण ता.१७-: ज्या शाळेने ज्ञानदानाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण दिले ती शाळा आपली मातृसंस्था असल्याने या मातृसंस्थेचे ऋण विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये, जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची ताकद यातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करतानाच आपल्या शाळेचा, संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण भंडारी येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेतील तसेच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत,जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, प्रा.रुपेश बांदेकर उपस्थित होते.

प्रारंभी एच.बी. तिवले यांनी स्वागत केले. तर आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वामन खोत यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, त्या क्षेत्रात आपण टॉपर कसे राहू त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, हे प्रयत्न सफल होण्यासाठी मनात जिद्द बाळगली पाहिजे, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने ज्ञान ग्रहण करून यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी तर आभार प्रदर्शन संदीप संदीप अवसरे यांनी केले.

You cannot copy content of this page