⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी चिन्मय विक्रम कोटणीस याने मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल येथे ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्राथमिक गटातून इयत्ता पाचवी ते सातवी कुमार चिन्मय विक्रम कोटणीस यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून रोख रक्कम दोन हजार प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे बक्षीसाचे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सुस्मिता एस. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. चिन्मय कोटणीस व मार्गदर्शक शिक्षिका एस. एस. चव्हाण यांचे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस. व्ही भुरे, संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
