मंत्री दिपक केसरकर:राजकीय पोळी भाजून घेण्याची विनायक राऊत व सहकाऱ्यांची पूर्वीपासूनची सवय..
⚡सावंतवाडी ता.१६-: स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही. आजगावला आमच्या जमिनी या पुर्वीपासून आहे. या जमिनींवर कुठलाही मायनिंग प्रोजेक्ट नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, नाहक बदनामी करायची ही माजी खासदार विनायक राऊत यांची सवय आहे असा पलटवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तर रेडी मायनिंग ६०-७० वर्षांपेक्षा जून आहे. तिथे आदर्श पद्धत राबविली जाते. त्याची तुलना इतर प्रोजेक्टसोबत होऊ शकत नाही असंही ते म्हणाले. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले,माजी खासदार विनायक राऊत यांनी आत्मक्लेश करून घ्यावा, खोटं किती बोलावं याला मर्यादा आहेत. आजगावला आमच्या जमिनी या पुर्वीपासून आहे. या जमिनींवर कुठलाही मायनिंग प्रोजेक्ट नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, नाहक बदनामी करायची ही विनायक राऊत यांना सवय आहे. मी कुठलीही जमीन मायनिंगला दिलेली नाही. केवळ रेडीचा प्रकल्प हा स्थानिकांच्या मागणीनुसार सुरू केला. हे मायनिंग ६०-७० वर्षांपेक्षा जून मायनिंग आहे. तिथे आदर्श पद्धत राबविली जाते. बिस्लरी सारखं पाणी ग्रामस्थांना नळाद्वारे पुरवलं जातं. आरोग्य, शिक्षणासह सगळ्या पद्धतीची मदत ग्रामस्थांना केली जाते. तिथला आर्थिकस्तर देखील सुधारलेला आहे. विविध व्यवसायांना चालना मिळाली आहे. त्याची तुलना इतर प्रोजेक्टसोबत होऊ शकत नाही. नवीन लोकांना प्रोजेक्ट करायचे असतील तर ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे. येथील पर्यावरणाच रक्षण कसे होईल याची काळजी घेतली पाहिजे. तरच इथे काहीतरी होऊ शकत. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे. ग्रामस्थांना जे हवं त्याला माझा पाठिंबा आहे. ग्रामस्थांचा ज्याला विरोध असेल त्याला माझाही विरोधच राहील. याबाबत कुठलीही शंका ग्रामस्थांनी बाळगू नये अस मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
तर आंदोलन करून त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याची विनायक राऊत व सहकाऱ्यांची पूर्वीपासूनची सवय आहे. त्यामुळे मी स्थानिक लोकांची भेट घेऊन चर्चा करेन. हे आंदोलन स्थानिकांच आहे. त्या प्रकल्पाबद्दल माहिती घेऊन शासनाकडे स्थानिकांच मागणं पोहचवण्याच काम आमदार म्हणून करेन. दरम्यान, गोवा हे सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे. पण, त्या भागात देखील मायनिंग आहे. मायनिंग कोणत्या भागात व पर्यटन कोणत्या भागात हा ज्यांनी त्यांनी विचार करायचा प्रश्न आहे. गोव्यात मायनिंग बंद झालं तेव्हा डंपर व्यवसायिक बेरोजगार झाले होते. गोव्याची अर्थव्यवस्था कोसळली होती. पर्यटन आणि मायनिंग एकत्र होऊ शकत नाही असं म्हणू शकत नाही. गोवा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
