मंगेश लोके:हिमंत असेल तर शहरातील सर्व स्टॉलधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा;आम्ही जाहीर पाठिंबा देऊ..
⚡वैभववाडी ता.१५-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या हातात नगरपंचायतीपासुन केंद्रापर्यत सत्ता आहे.मात्र ते वैभववाडीचा कोणताही विकास करू शकले नाहीत.त्याची प्रचित शहरातील नागरिकांना पावलोपावली येत आहेत.उघडी गटारे,सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही,साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ते सोडवु शकलेले नाही.शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे.चुकीच्या नियोजनामुळे या पावसात अनेकांच्या घरापर्यत पाणी पोहोचले ही वस्तुस्थिती जनतेसमोर आहे.तीच आमच्या शहरातील नगरसेवकांनी जनतेसमोर मांडल्यानतंर सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे.काय करावे ते त्यांना सुचत नाही.त्यामुळे स्वताचे अपयश लपवुन ठेवण्यासाठी आता आमच्या आरोप करण्याचे काम नगरपंचायतीचे पदाधिकारी करीत आहेत. असा अरोरप प्रसिद्ध पत्रकातुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख यांनी केले आहेत.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांची स्टॉलधारकासंदर्भात काय भुमिका होती ही सर्व स्टॉलधारकांना माहीती आहे.त्यामुळे त्यांनी आमच्या आरोप करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही.नगरपंचायत स्टॉलधारकांचे पुनर्वसन करताना त्यांची फसवणुक करीत होती.ही फसवणुक आम्ही थांबविण्याचे काम केले आहे.नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी शहरातील सर्व स्टॉलधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार असाल तर आमचा जाहीर पाठींबा आहे.परंतु त्यांची फसवणुक करणार असाल तर आम्ही ती होवु देणार नाही.स्टॉलधारकांचे पुनर्वसन शासकीय गोडावुन जवळ करणार होता मग अगोदर स्टॉल हटविण्याचे कारण काय?स्टॉल हटविण्याची घाई श्री.रावराणे यांनाच होती.श्री.रावराणे हे सज्जनकाका रावराणे यांचे सुपुत्र आहेत.सज्जनकाका आणि आमचे अनेक वर्षाचे पक्षीय राजकारणापलीकडचे सबंध आहेत.परंतु जर विवेक रावराणे कुणाच्या तरी नादाला लागून नौटंकी करीत असतील तर मात्र त्यांना पळताभुई थोडी होईल हे त्यांनी विसरू नये.त्यांनी शहरात काय काय घोळ घालुन ठेवले आहेत.त्याचा लेखाजोखा माझ्याकडे आहेत हे त्यांनी विसरू नये.
स्विकृत नगरसेवक मनोज सावंत यांच्यावर टिका करताना उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचा देखील तोल गेल्याचे दिसुन येत आहे.श्री.सावंत हे ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे ते शहरातील नागरिकांशी प्रामाणिक असुन त्याच हेतुने काम करीत आहेत.त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न श्री.सावंत यांनी करू नये अन्यथा त्यांची कुंडली देखील बाहेर काढावी लागेल.गटाराच्या दुर्दशेवरूनच तुमच्या विकास कामांची दिशा जनतेला कळली आहे.त्यामुळे यापुढे तरी तुम्हाला शहाणपण सुचेल अशी आशा बाळगतो.
