राजन पोकळे: कार्यक्रमाची रूपरेषा केली जाहीर..
⚡सावंतवाडी ता.१२-: मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची रूपरेषा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांचा वाढदिवस १८ रोजी साजरा होणार असून तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने 18 वाजून उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
सावंतवाडीतमध्ये युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकारातून रक्तदान शिबीर, अभिनव फाउंडेशनला रूग्णवाहिका भेट देण्यात येणार असून त्याच संचलन युवा रक्तदाता संघटना करणार आहे अशी माहिती राजन पोकळे यांनी दिली. तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन समुह नृत्य’ स्पर्धा, ‘भजन महोत्सव’ २०२४ च आयोजन करण्यात आलं आहे. १८ जुलैपासून पुढील आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी दिली.
दरम्यान, वेंगुर्ला येथे १७ जुलैला शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व सचिन वालावलकर मित्रमंडळ आयोजित आषाढी एकादशीनिमित्त जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा, जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. १८ जुलैला वेंगुर्ले भाजी मार्केट हनुमान मंदिरात लघुरुद्र, हॉलिबॉल स्पर्धा, प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण,वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व वेताळ प्रतिष्ठान, तुळससाठी रुग्णवाहिका लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. मान्सुन महोत्सव अंतर्गत १८ ते २० जुलै पर्यंत दशावतार नाट्यमहोत्सव होणार आहे. दोडामार्ग तालुक्यात देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मॅरोथॉन स्पर्धा, रूग्णांना फळवाटप, जीवनावश्यक वस्तूंच वाटप आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, प्रथमेश प्रभू, सायली होडावडेकर, पूजा नाईक, शिवानी पाटकर, विश्वास घाग आदी उपस्थित होते
