बांदा/प्रतिनिधी
बांदा – कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे रविवार दिनांक १४ जुलै रोजी ‘आषाढ महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त येथील आनंदी मंगल कार्यालयात रात्री ८ वाजता ‘द्रौपदी वस्त्रहरण’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला आहे.
या नाट्यप्रयोगात प्रतीक कलिंगण, उदय कोनसकर, उदय मोर्ये, प्रथमेश खवणेकर, महेंद्र कुडव, आनंद कोरगावकर, बाबली नाईक, दादा राणे कोनस्कर, राजू हरीयाण, बंटी कांबळी व प्रशांत मेस्त्री हे दिग्गज दशावतार कलाकार सहभागी आहेत. सदर नाटकासाठी हार्मोनियम पप्पू घाडीगावकर, मृदुंगमणी चंदू खोत व झांज वादक विनायक सावंत यांची साथसंगत राहील. नाट्यप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
बांदा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे १४ रोजी ‘आषाढ महोत्सव २०२४’ चे आयोजन…
