सोनू सावंत मित्रमंडळातर्फे आयोजन;सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान करावे…
*💫कणकवली दि.२६-:* भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सोनु सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीरआयोजित करण्यात आले आहे. सोनू सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रमांची रेलचेल असते. मात्र, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोनू सावंत यांच्या वाढदिनी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोनू सावंत यांच्या वाढदिनी २८ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबीर होणार आहे.सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे सोनू सावंत मित्रमंडळाने आवाहन केले आहे. गावात ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमात आबालवृद्धांचा मोठया प्रमाणात सहभाग असतो.आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सोनू सावंत प्रेमींची गर्दी उसळत असते.कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. २८ नोव्हेंबर रोजी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात रक्तदान शिबिर सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळून होणार आहे,असे सोनू सावंत मित्रमंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.