*💫सावंतवाडी दि.२६-:* मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड- १९ आरटीपीसिआर चाचणीत प्रशालेतील २ कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शालेय कामकाज सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले.पुढिल आदेश व परिस्थीती पाहुन शाळा चालू करण्यात येईल, असे शाळेतर्फे जाहीर करण्यात आले. शालेय समितीचे चेअरमन, माजी सभापती राजू परब यानी केल नियोजन. संजु विर्नोड कर टिमने प्रत्येक वर्ग खोली, भींती, कार्यालय, सभागृह, प्रयोगशाळा, स्वच्छालये, स्वयंपाक गृह, गेट अंतर्गत रस्ते परिसरात जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण केल. टिमचे संतोष तळवणेकर, आकाश मराठे, तुषार बांदेकर, मुख्याधापक वैजनाथ देवण, पर्यवेशिका श्रद्धा सावंत, रितेश राऊळ, बाळा जाधव, विलास जाधव यांनी उपक्रमात सहभाग घेतला. माजी सभापती व विद्यालयाचे चेअरमन राजु परब यानी संजू विर्नोडकर टिमच्या या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रशाला ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येईल. पुढिल आदेश व परिस्थीती पाहुन शाळा चालू करण्यात येईल, असे शाळेतर्फे जाहीर करण्यात आले.
मळगाव इंग्लिश स्कूलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शालेय कामकाज ३० नोव्हेंबरपर्यंत बंद….
