बाळा गावडे:दीपक केसरकरे फक्त मायनिंग लॉबीचे एजंट आहेत
⚡सावंतवाडी ता.०९-: सवंग लोकप्रियतेसाठीच मंत्री दीपक केसरकर यांनी विकासाच्या वल्गना केल्या, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसरकर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी, जर्मनीत तरुणांना रोजगार, पर्यटन प्रकल्प यावर बोलत आहेत, सुज्ञ जनता दीपक केसरकर यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही, येत्या निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास शिवसेना (उबाठा) चे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केला.
गेली 15 वर्षात चष्माचे कारखाने, सेट ऑप बॉक्स, महिला बचत गटांसाठी काथा व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय अशा अनेक व्यवसायांवर बोलून यापैकी कोणताही व्यवसाय या मतदारसंघात राबवला नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सावंतवाडी तालुक्यात मंजूर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या हेकेकोरपणामुळे गेली सात वर्ष झाले नाही. त्यामुळे सामान्य जनतेला आरोग्याच्या प्रश्नासाठी अजूनही गोवा बांबोळी येथे जावे लागते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रात प्रगत जिल्हा आहे. आणि अशा जिल्ह्यातिल शिक्षणाचे आणि तरुणांचे प्रश्न यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुटले नसून वाढत चालले आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत न्याय मिळाला नाही.
कोविडच्या काळात दीपक केसरकर या मतदारसंघाचे आमदार असताना मुंबईत लपून बसलेले. जनतेच्या मदतीसाठी त्यांनी कुठेही सहकार्य केलेले नाही. दीपक केसरकरे फक्त मायनिंग लॉबीचे एजंट आहेत. म्हणून आजगाव धाकोरा येथे होणाऱ्या मायनिंगचे ते एजंट म्हणून काम करत आहेत. आणि जर ते एजंट नसतील तर त्यांनी आजगाव धाकोऱ्याची मायनिंग रद्द करून दाखवा वी.
भाजपचे राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत विकासाच्या दृष्टीने मागे गेला अशी वक्तव्य केलीत. राजन तेली सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा केविलवाणी धडपड करत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता राजन तेली हे दोनदा पराभूत झालेले आहेत. भविष्यात या मतदारसंघात बाहेरून आलेले उमेदवार जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे राजन तेलीं यांना पराभवाची हॅट्रिक करायचे असेल तर त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत रिंगणात उतरावे.
गेल्या पंधरा वर्षात मंत्री दीपक केसरकर यांनी अनेक राजकीय नेत्यांचा फायदा घेऊन आपल्या मंत्रिपदाच्या स्वार्थासाठी जे राजकारण केलं ते सर्व राजकीय नेते या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांचं अवघड जागेचं दुखणं ठरणार आहेत हे दीपक केसरकर यांनी लक्षात ठेवावे. आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्री दीपक केसरकर यांच्या खोट्या भुलथापांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता आता बळी पडणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दीपक केसरकर यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाठी राजकीय पुनर्वसन करून मंत्रिपद दिलं. परंतु त्यांच्यासोबत सुद्धा यांनी गद्दारी केली. त्यामुळे या गद्दार दीपक केसरकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अद्दल घडवून घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत .. असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी व्यक्त केला.
