⚡मालवण ता.०८-:
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेतर्फे दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘बरसती रंगसरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘जुनं मालवण ते आताचं मालवण’ हा प्रवास विनोदी पद्धतीने गीत, नृत्यांसह या कार्यक्रमात साकारण्याचा प्रयत्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
