राजू बेग: नगरपरिषदेकडे निवेदनद्वारे केली मागणी..
सावंतवाडी ता.०८-: बाजारपेठेतील नाले साफ न केल्याने काल संपूर्ण बाजारपेठेत पाणी आले त्यामुळे तात्काळ नगरपालिकेने नाले साफ करून घ्यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी केली आहे.
दरम्यान शहरातील मुख्य नाला विसावा हॉटेल ते मच्छी मार्केट पर्यंत बंदिस्त केलेले आहेत, गेले वीस वर्षे साफसफाई न झाल्याने अनेक बाटल्या प्लास्टिक इतर साहित्य साचले आहेत, त्यामुळे अनेक दुकानात पाणी शिरूर मोठ्या प्रमाण नुकसान झाले. तरी त्वरित नगरपालिकेने याची दखल घेऊन सर्व नाले साफ करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
