⚡कणकवली ता.०७-: तालुक्यातील फोंडाघाट येथे मुसळधार झालेल्या पावसाचा फटका घोणसरी गावातील आयरेवाडी येथील पांडुरंग जाधव यांच्या घरावर झाड पडुन नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घोणसरी आयरेवाडी येथील पांडुरंग वसंत जाधव यांच्या घरावर रविवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे सायंकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंब्याचे झाड कोसळले. यात जाधव यांच्या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणेला याबाबत कळविण्यात आले होते.
घोणसरी येथे घरावर कोसळले आंब्याचे झाड ; मोठे नुकसान…
