लायन्स क्लबने केला डॉक्टर्स डे, कृषी दिन, सी ए दिन साजरा…

पदग्रहण होण्या आधीच अध्यक्ष महेश अंधारी यांचा उपक्रम..

⚡मालवण ता.०३-:
मालवण लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पदग्रहण सोहळ्यापूर्वीच सामाजिक कार्यास सुरुवात करून एक नवा पायंडा पाडला आहे लायन्स महेश अंधारी यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याअगोदरच लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर्स डे, कृषी दिन आणि सी.ए. दिन यांचे औचित्य साधून मालवण मधील डाक्टर्सना तसेच कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

लायन्स क्लब मालवण तर्फे मालवणातील डॉ. दर्शन खानोलकर, डॉ यज्ञा तारी, डॉ. सुविधा गवस, डॉ. सचिन दिघे, डॉ. अश्विन दिघे, डॉ. संजय पाटील, डॉ. शशिकांत झाट्ये, डॉ. अमोल झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये यांचा कल्पवृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कृषी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनाही कल्पवृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे नवनिर्वाचित सचिव सौ. फॅनी फर्नांडिस, खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर, सौ. अनुष्का चव्हाण, सौ. जयश्री हडकर, सौ. वैशाली शंकरदास, सौ. रूपा कांदळगावकर, सौ. राधिका मोंडकर, सौ. दिक्षा गावकर, मनीषा गावकर, सौ. नंदिनी गावकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, सहदेव बापर्डेकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page