इन्सुलीत दोन दुचाकीची अपघात…

दोन्ही दुचाकीस्वार जखमी:अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविले..

⚡बांदा ता.०३-: इन्सुली कोंडवाडा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज सायंकाळी उशिरा झाला. दोघांवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात समीर गवळी (रा. कारिवडे) व आपा (रा. गाळेल, संपूर्ण नाव समजू शकले नाही) हे गंभीर जखमी झालेत.

You cannot copy content of this page