राजन तेली:मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ केसरकरांची तक्रार करणार..
सावंतवाडी ता.०२-: दीपक केसरकर यांना स्वतःचे शालेय शिक्षण मंत्री हे खाते समजले नाही त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था दुर्दैवी झाली आहे. राज्याच्या निकषाचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक दर्जावर होत असून शिक्षण खात्यात अनागोंदी कारभार सुरू आहे याबाबत आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ तक्रार करणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे सांगितले.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक संस्था आणि प्राथमिक शांळामधील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वेळप्रसंगी त्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराही श्री तेली यांनी दिला
