शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव हायस्कूलचे यश

*पार्थ राऊळ जिल्ह्यात दुसरा तर सावंतवाडी तालुक्यात प्रथम

*💫सावंतवाडी दि.२६-:* : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावने उज्ज्वल यश संपादन केले. या प्रशालेचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी पार्थ प्रशांत राऊळ याने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय तर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७५ टक्के निकाल लागला आहे. यात चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पार्थ राऊळ याने (८३.६७) गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मिळविली तर जिल्ह्यात द्वितीय तर सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. निरंजन अमरदीप वेंगुर्लेकर (७०.७६) गुण प्राप्त झाले असून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तेजल विजय सावंत व स्वप्नील जोतिबा फडके या दोघांनाही (५९.१८) गुण प्राप्त झाले असून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) एकूण बारा विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७५ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत निधी चंद्रकांत राऊळ (८१.९४) जिल्ह्यात एकवीसावी आली असून तालुक्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. शांताराम महेश गुडेकर (८१.२५) गुण प्राप्त केले असून जिल्ह्यात २४ वा तर तालुक्यात आठवा आला आहे. मृण्मयी अनिल नाईक (७६.३८) गुण प्राप्त झाले असून ती जिल्ह्यात ६७ वी आली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञा मातोंडकर, नेहा गोसावी, राजाराम गोल्याळकर, सुनील कदम, शैलजा परुळकर, मारुती फाले, ओमप्रकाश तिवरेकर, विठ्ठल सावंत, संदीप कारीवडेकर, ऋतुजा सावंत-भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र परब, सदस्य मनोहर राऊळ यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक प्रशालेचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, पर्यवेक्षिका श्रद्धा सावंत, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page