स्टॉल पुन्हा उभारल्यास त्याच्यावर दाखल करणार फौजदारी गुन्हा-संजू परब
*💫सावंतवाडी दि.२६-:* शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी पुन्हा उभारलेला तो अनधीकृत स्टाॅल आज पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आला. यापुढे त्या ठिकाणी जर कोणी पुन्हा स्टॉल उभा केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशाराही नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. शहरातील गांधी चौक परिसरामध्ये हंगामी सिझण्यासाठी देण्यात आलेला स्टॉल पालिका प्रशासनाकडून पाठविण्यात आल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित स्टॉल धारकाची बाजू उचलून धरत पालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी ढोल बजाव आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये पालिकेतील विरोधी गटाचे शिवसेनेचे नगरसेवकही सहभागी झाले होते आंदोलनानंतर पालिकेने हटवलेल्या तो स्टॉल पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उभा केला होता. नगराध्यक्ष संजू परब यांनी यावर पत्रकार परिषद घेताना कोणत्याही परिस्थितीत उभा केलेला तो स्टॉल हटविणारच असे सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सदरचा स्टॉल हटवित जागा मोकळी केली. एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी ज्या पदाधिकाऱ्यांकडून सोमवारी मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले असताना आज स्टॉल पाठवण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीत रवी जाधव यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी शिवसेनेच्या पदाधिकारी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबत बाबत नगराध्यक्ष संजू परब यांना विचारले असता ते म्हणाले उभारलेला तो स्टॉल चुकीच्या पद्धतीने अनाधिकृत होता त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे तो स्टॉल आज पाठवण्यात आला यापुढे त्या ठिकाणी जर कोण स्टाॅल उभा करण्यासाठी गेल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या आधी ज्यांनी स्टॉल उभारला त्यांना माफ केले आहेत मात्र यापुढे गय केले जाणार नाही.