ऑक्टोंबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बसणार-:अमित सामंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झाले.पण पैशाच्या जोरावर विकला गेलेला मतदार कोकणातला आहे असे मला वाटत नाही. मतदारांना दोष देणे योग्य नाही असे मत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर विश्वास आहे. मात्र महायुतीत असे दिसत नाही असेही सामंत म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात निवडणुकीत लीड देणारे कार्यकर्ते विकले गेले नाहीत का ? असा प्रश्न देखील शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित केला.
नवीन उमेदीने लढायला सामोरे जाऊया यश आपलेच आहे. येत्या ऑक्टोबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात बसणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
जामसंडे सांस्कृतिक भवन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मतदारांचे आभार कार्यक्रमा दरम्यान व्यासपीठावरून बोलत होते.यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

You cannot copy content of this page