⚡मालवण ता.१६-:
आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या संकल्पनेतून वराड ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
कोरोना काळापासून आज पर्यंत आभाळमाया ग्रुपचे हे १० वे रक्तदान शिबिर आहे. या शिबिरास वराड सरपंच सौ. शलाका समीर रावले, कट्टा सरपंच शेखर पेणकर, आंबेरी सरपंच मनोज डीचोलकर, वराड उपसरपंच गोपाळ परब, हॉटेल अथिती बांबूचे मालक संजय गावडे, धक्का मित्रमंडळाचे भूषण पिसे, समाजसेवक सुनील नाईक, उद्योजक देवेन उर्फ पप्पू ढोलम, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगावकर, स्मिता कॉम्प्युटर इंस्टिट्यूट संचालिका सौ. श्रद्धा नाईक, डॉ. प्रथमेश वालावलकर, समाजसेवक अनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि आभाळमाया ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी गावातील एक दिव्यांग ग्रामस्थ योगेश परब यांना आभाळमाया ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकीतुन तीन चाकी सायकल देण्यात आली. अशी माहिती ग्रुपच्या वतीने देण्यात आली.