नूतन मबाक सभापती सौ गांवकर यांची माहिती;सेमी इंग्रजी सुरु करणार
सावंतवाडी-: जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी यापुढे स्मार्ट अंगणवाडी ही संकल्पना राबविताना अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना सेमी इंग्लिश इंग्लिशचे धडे देण्याचा आपला मानस असून, त्यासाठी सुरूवातीला काही ठिकाणी पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचे मत नवनिर्वाचित जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ शर्वाणी गावकर यांनी व्यक्त केले आहे. सावंतवाडी पंचायत समितीला आज महिला बालकल्याण सभापती सौ. गावकर यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी प्रभारी सभापती शितल राऊळ, प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर , श्रीकृष्ण सावंत, मानसी धुरी, गौरी पावसकर आदिनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
